Ad will apear here
Next
ग्लेनमार्कला मधुमेहावरील नवीन औषधाला मंजुरी
पुणे : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडला (ग्लेनमार्क)  पेटंट संरक्षित आणि जागतिक पातळीवर संशोधन केलेल्या रेमोग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन फिल्म कोटेड गोळ्यांच्या संयुगांसाठी नियामकांची मान्यता मिळाली असून, सोडियम ग्लुकोज को-ट्रान्सपोर्टर-दोन (एसजीएलटी२), इन्हिबिटर रेमोग्लिफ्लोझिन एटाबोनेट (रेमोग्लिफ्लोझिन) आणि मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड (मेटफॉर्मिन) फिल्म कोटेड गोळ्या भारतात आणण्याची परवानगी मिळाली आहे. हे औषध प्रौढांमध्ये टाइप दोन प्रकारच्या मधुमेहावरील उपचारांसाठी सुचवले जाते. ‘रेमो-एम’ आणि ‘रेमोझेन-एम’ या नावाने ही औषधे बाजारात आणली जाणार आहेत.  

‘ग्लेनमार्क ही भारतातील मधुमेही रूग्णांना अद्ययावत उपचार पर्याय देण्यातील आघाडीची कंपनी आहे. रेमोग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन यांच्या संयुगासाठीची मान्यता ही भारतात मधुमेह व्यवस्थापनाची क्रांती करण्याप्रति आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मधुमेहाचा प्रसार वेगाने वाढू लागल्यामुळे रूग्णांना प्रभावी उपचार पर्याय देताना खूप आनंद होत आहे,’ असे मत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्युलेशन्स, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील अध्यक्ष सुजेश वासुदेवन यांनी व्यक्त केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSKCD
Similar Posts
‘फ्रीडम फ्रॉम डायबेटीस’तर्फे मुक्तोत्सवाचे आयोजन पुणे : फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशनतर्फे मधुमेहींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मुक्तोत्सव २०१८’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन २९ सप्टेंबर २०१८ रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास असणार आहे
‘उपवासासाठी मधुमेहाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा’ पुणे : सणासुदीच्या काळात उपवासासाठी मधुमेहाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचा सल्ला वाइस डायबेटीस अ‍ॅंड रिसर्च सेंटरचे संचालक व मधुमेहतज्ज्ञ डॉ. सी. राव यांनी दिला.
तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद पुण्यात पुणे : चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीतर्फे आठ ते १० मार्च २०१९ या कालावधीत पुण्यातील हॉटेल जेडब्लू मॅरीयेट येथे आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद असून, याचे उद्घाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस’चा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित पुणे : इंटरनॅशनल जर्नल ऑफ डायबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये फ्रीडम फ्रॉम डायबेटिस रिसर्च फाउंडेशनचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. हा शोधनिबंध ‘जीवनशैलीतील बदलांमुळे टाइप टू मधुमेहींना झालेले फायदे’ या विषयावर सादर करण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language